मा. श्री. अविष्कार अनिता दादाजी भुसे यांच्यातर्फे मालेगाव तालुक्यातील 10 वी, 12वी व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रा. शिवराज मोटेगावकर सरांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांचा राज्याचे शिक्षणमंत्री मा. श्री. दादाजी भुसे साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला NIA चे महासंचालक श्री. सदानंद दाते, हभप. इंद्रजित देशमुख, श्री. तेगबीर सिंग संधू (Add. S.P मालेगांव), श्री. संतोष खाडे (ACP/DYSP महाराष्ट्र पोलीस), श्री. सूरज गुंजाळ (DYSP (मालेगांव), श्री. दत्ता कोहिनकर (सल्लागार : सुर्यदत्त इन्स्टिट्यूट, चेअरमन: विपश्यना केंद्र, पुणे) श्री. रंजन कोळंबे (भगीरथ IAS अकैडमी, पुणे.) आदि मान्यवर उपस्थित होते.



 
								 
								

